लातूर: गंजगोलाईला २०१७ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार. गोलाईचं सुशोभिकरण केलं जाणार असं सांगितलं गेलं पण झालं काहीच नाही. लातुरचे हरहुन्नरी कलावंत, दिग्दर्शक, लेखक, विधिज्ञ आणि नगरसेवक शैलेश गोजमगुंडे यांनी एक सुंदर गाणं तयार केलं. हे गाणं सर्वत्र गाजतंय. युट्यूबवर मोठ्या प्रमाणावर शेअरही होतंय. आता गोजमगुंडे यांनी नवा प्रकल्प हाती घेतलाय. शिवरायांवर ते दृकश्राव्य गाण्याची निर्मिती करीत आहेत. गाणं तयार आहे. त्यासाठीचं चित्रिकरणही सुरु आहे. काल भिमाशंकर आणि पापविनाश येथे चित्रिकरण झालं. एका संपूर्ण गाण्यात संपूर्ण शिवचरित्र दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या प्रयोगानंतर काही लघुपट आणि नंतर चित्रपट करण्याचं आम्ही ठरवलं आहे. यातील प्रत्येक कलावंत, संगीतकार, गीतकार, नेपथ्यकार, वेशभूषाकार सगळी मंडळी लातुरचीच असेल. अलीकडे चित्रपटात काम देतो म्हणून मोठ्या प्रमाणावर युवक, युवतींची फसवणूक केली जाते. त्यापासून दूर रहावं असं शैलेश सांगतात.
Comments