लातूर: लातूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातील दुसर्या गेटला खेटून एक तंबू थाटण्यात आला आहे. हा तंबू सुरक्षा जवानांचा किंवा पोलिसांचा असावा असे प्रथमदर्शनी वाटते. पण हे अग्निशामक दलाचे मनपातील स्टेशन आहे. बाजुलाच एक गाडी उभी असते. ती उन्हातान्हात, पावसात तळत असते. पाऊस आला की तंबूत पाणी शिरते, कर्मचारी दफ्तर घेऊन मनपाच्या इमारतीचा आसरा घेतात. पुन्हा तंबूत येऊन बसतात. पावसाने तंबू तर ओला होतोच शिवाय शिरलेल्या पाण्याने सतरंजी भिजून जाते. रात्र काढायची कशी? शहरात हजारो ठिकाणी अतिक्रमणे आहेत. कुणी त्यावर घरे बांधली तर कुणी दुकाने. मनपाला आपल्याच जागेत, आपल्याच सेवेकर्यांसाठी दहा बाय दहाची एक खोलीही बांधता येत नाही. हे दुर्दैव आहे!
Comments