HOME   टॉप स्टोरी

औशाचं तिकिट मागितलंय, लढ म्हणाले तर लढणार!

अभिमन्यू पवारांनी केलं वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री निधीला सहकार्य करण्याचं आवाहन


लातूर: येत्या विधानसभा निवडणुकीत आपण औसा मतदारसंघ लढवण्यास तयार आहोत. मा. नुख्यमंत्र्यांनी लढ म्हटल्यास नक्कीच लढू. तशी मागणीही आपण करीत आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिली. ते आजलातूरशी बोलत होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी विश्रामगृहावर मोठी गर्दी केली होती.
मुख्यमंत्र्यांचं लातुरवर विशेष प्रेम आहे. जे जे नागपूरला झालं ते सगळं लातुरला मिळालंय. लातुरच्या फारशा समस्या राहिलेल्या नाहीत असेही पवार यांनी सांगितले. आज त्यांनी विश्रामगृह, लातुरचे निवासस्थान आणि औसा येथील जनतेशी वार्तालाप केला, शुभेच्छा स्विकारल्या. लोकांचे प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहिला आहे. तसाच तो पुढेही राहील. विद्यार्थ्यांसाठी काम करायचंय असा मानस त्यांनी व्यक्त केला.


Comments

Top