HOME   टॉप स्टोरी

हेची दान देगा देवा, महागाई अन बेकारीचा ठेवा!

लातुरात पेट्रोल आणि डिझेल अडीच रुपयांनी महागलं, महागाईही वाढणार


लातूर: कालच्या अर्थसंकल्पाने समाजातील अनेक घटकांची निराशा केली. या संकल्पात इंधनाचे दर कमी होतील, परिणामी महगाई कमी होईल अशी अपेक्षा होती पण झाले वेगळेच. पेट्रोल आणि डिझेलवर नव्यानं एक रुपयांचा सेस लावल्याने दर वाढले. सेस एक रुपयाने वाढला असला तरी लातुरात प्रत्यक्षात अडीच रुपयांनी डिझेल आणि पेट्रोल महागले. काल लातुरात पेट्रोल ७७.०३ रुपयांनी मिळायचे आज त्याचा भाव ७९ रुपये ५६ पैसे एवढा झाला आहे. काल डिझेलचा भाव ६७.२२ रुपये होता. तो आज ६९.७८ रुपयांवर गेला आहे.


Comments

Top