लातूर: अब की बार मुस्लीम आमदार अशी चर्चा-घोषणा ऐकायला येतेय. लातूर मुस्लीमबहुल शहर असल्यानं आणि त्यातच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यानं या समाजाच्या आशा दुणावल्या आहेत. या मतदारसंघात वंचित बहुनन आघाडीलाच यश मिळेल असा दावा लातूर एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष अफजल कुरेशी यांनी केला. यासोबतच उदगीर, अहमदपूर आणि औशावरही दावा केला आहे. लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात वंचितचे प्राबल्य राहिल. राज्यात सत्तेपर्यंत पोचू, किमान सत्तेत भागिदारी तरी मिळवू. लक्ष्मण माने यांची नाराजी नक्कीच दूर होईल. लातूर मतदारसंघातील बडे बडे कॉंग्रेस आणि भाजपाचे नेते वंचितच्या संपर्कात आहेत, त्यांना वंचितकडून उमेदवारी हवी आहे असाही दावा कुरेशी यांनी केला. आणखी बर्याच मुद्द्यांवर कुरेशी अतिशय विश्वासपूर्वक आणि ठाम बोलले.....
Comments