लातूर: लातुरचे महापौर सुरेश पवार पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मनपाच्या अर्थसंकल्पीय सभेत ते राजीनामा देतील असं बोललं जात होतं. पण तसं झालं नाही. अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेची मंजुरी हवी असते. मंजुरी देण्याआधीच सभा गुंडाळली गेली. यात विरोधकांनी सत्ताधार्यांना साथ दिली, महापौरांना राजीनामा देऊच दिला नाही.
Comments