लातूर: लातूर मनपाकडून अवाजवी कर आकारला जातोय, करासाठी नागरिकांना वेठीला धरलं जातंय, महावितरण नवीन मीटर लावून ग्राहकांची लूट करीत आहे असा आरोप म्करीत नागरिक कृती समितीने ०६ ऑगस्ट रोजी लातूर बंदची हाक दिली आहे. याच्या विरोधात लातूर मनपाच्या प्रांगणात निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, उदय गवारे, दीपक सूळ, अशोक गोविंदपूरकर, रवीशंकर जाधव, सचिन बंडापल्ले, सपना किसवे, युनूस मोमीन यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.
Comments