HOME   टॉप स्टोरी

बिडवे यांच्या कारभाराची सीबीआय चौकशी करा

बसवेश्वरच्या चार सेवकांची पाच दिवसांपासून धरणे, दखल नाही


लातूर: येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात काम करणार्‍या पाच सेवकांनी देशीकेंद्र शाळेसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची अद्याप कुणीही दखल घेतली नाहीसंतोष अमृत राटोड, बालाजी होनराव, श्वशंकर खुब्बा, वीरभद्र कोरे आणि आत्माराम भडंगे अशी या पाच जणांची आहेत. शिवशंकरअप्पा उटगे आणि प्राचार्य लखदिवे यांनी केवळ तोंडी आदेश देऊन बेकायदेशीररित्या कामावरुन कमी केली. सेवाशर्ती आणि नियमांप्रमाणे आम्हा सर्वांना कायम केले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. शिवशंकर उटगे यांच्या कारभाराची सीबीआयमार्फत चौकशी करा अशी मागणी या पाचजणांनी निवेदनाद्वारे केली आहे.


Comments

Top