HOME   टॉप स्टोरी

होय, देव आहे, लातुरात, बघा ही बातमी!

देवानं बसवला डिव्हायडरवर फलक, अपघात थांबले!


रवींद्र जगताप, लातूर: कुणी म्हणतं देव आहे, कुणी म्हणतं देव नाही. पण देव आहे याची प्रचिती आम्हाला बार्शी मार्गावर आली. शहरातून सुरु होणारा रस्ता दुभाजक हरंगुळ फाट्यावर पाण्याच्या टाकीजवळ संपतो. रात्री बार्शी मार्गावरुन लातुरकडे येणारी वाहने डिव्हायडर कळत नसल्यानं त्यावर चढायची, पालथी उताणी व्हायची, अपघात व्हायचे. हे बघून कुणा सभ्य गृहस्थानं या डिव्हायडरच्या बार्शी मार्गाकडील टोकावर दोन तीन दगड आणले, दगडाला शेंदूर फासला. रात्री हा शेंदूर चमकायचा आणि वाहनं हळुवार अपघातग्रस्त न होता जायची. किती दिवस देवाला डिव्हायडरमध्ये ठेवायचं? बहुधा सार्वजनिक बांधकाम खाते लाजले असावे, त्यांनी डिव्हायडरच्या टोकाला, देवाच्या बाजुला अंधारात कळणारा मोठा फलक लावला, ‘सावधान पुढे दुभाजक आरंभ’ असा हा फलक आहे. आता डिव्हायडर कळतो आणि वाहने डिव्हायडरवर चढत नाहीत, अपघात होत नाहीत. बघा हा फलक बसवायला कोण भाग पाडलं? देवानेच ना? म्हणून म्हणावसं वाटतं देव आहे!


Comments

Top