लातूर: विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा वंचितचा धसका वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातून प्रत्येकी १५ ते २० जणांनी वंचितकडे उमेदवारी मागितली आहे. जिल्ह्यातील विचारवंतांचा ओढा वंचितकडे वाढला आहे. अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांनी आजलातूरशी बोलताना दिली. आज लातुरच्या पत्रकार भवनच्या सभागृहात वंचितच्या आलुतेदार-बलुतेदार सत्ता संपादन संवाद अभियानांतर्गत मेळावा पार पडला. या मेळाव्याला भीमराव दळे, गोविंद दळवी यांनी मार्गदर्शन केले. अठरा पगड जातीतील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. वंचित घटकांपर्यंत सत्ता गेली पाहिजे, घराणेशाही रोखली पाहिजे हा उद्देश असून सगळीकडे उत्तम प्रतिसाद मिळत आहे असं सूर्यवंशी यांनी सांगितलं.
Comments