HOME   टॉप स्टोरी

मुख्य वीज वाहिनीच्या धक्क्याने पाचजण जखमी

तोष्णीवाल रुग्णालयात दाखल, नगरसेवक मनियार यांची धावाधाव


लातूर: शहरातील अंबाजोगाई मार्गावर नवे पथदिवे बसवणे सुरु आहे. बीएसल कंपनीमार्फत हे काम सुरु आहे. या कामासाठी मुख्य वीज वाहिनीवर काम करीत असताना शिडीचा स्पर्श झाल्याने पाच कामगारांना धक्का बसले. यात सलीम मनियार, युसूफ मनियार, समीर मनियार, बिलाल मनियार आणि पप्पू शिंदे जखमी झाले. तिघाजणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती नगरसेवक राजा मनियार यांनी धावाधाव केली. जखमी दाखल असलेल्या नाना नानी पार्कजवळच्या प्रेमविजय रुग्णालयात त्यांनी हवी ती मदत देण्याचा प्रयत्न केला.


Comments

Top