लातूर: लातूर वृक्ष ही चळवळ मागच्या अनेक वर्षांपासून शहरात वृक्षारोपणावर काम करीत आहे. या मोहिमेत आजपासून शहराचा पूर्व भाग हाती घेण्यात आला आहे. विवेकानंद चौक ते गरुड या दरम्यानच्या रस्ता दुभाजकात झाडे लावली जात आहेत. ही मोहीम उद्या पूर्ण होईल अशी माहिती नगरसेवक इम्रान सय्यद यांनी दिली. २०१८ पर्यंत अठरा हजार लावली. मोहीम सुरुच आहे. यात लोकही सहभागी होत आहेत. वृक्षारोपणासोबत संवर्धनातही हातभार लावला जात आहे. यावेळी सुपर्ण जगताप, डॉ. पवन लड्डा बागल उपस्थित होते. आम्ही झाडे लावली, आम्ही झाडे जगवणार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
Comments