HOME   टॉप स्टोरी

मनपात तमाशा, कर्मचारी अन कार्यकर्त्यात हाणामारी

घरकुलासाठी पैशाची मागणी केल्याचा दावा, कर्मचारी म्हणतो मला आधी मारले!


लातूर: महानगरपालिकेच्या कार्यालयात, आवारात आज दुपारी झालेल्या मारहाणीच्या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. चंद्रकला कांबळे या महिलेच्या घरकुलाच्या फाईलसाठी संतोष ठाकूर या रोड कारकुनाने एक हजार रुपये मागितले त्याचा जाब विचारला असता या कर्मचार्‍याने अरेरावीचे वर्तन केले, मारण्याचा प्रयत्न केला असं राजकुमार माने सांगतात. तर फाईलचा प्रवास योग्य रितीने सुरु असताना माने यांनीच मारहाण केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. उप महापौर देवीदास काळे आणि दीपक सूळ यांनी समेटाने मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बरीच गर्दी जमली होती. या प्रकरणी राजकुमार माने यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. घरकुल प्रकरणात सामान्यांना छळले जाते असा आरोप सर्रास केला जात आहे.


Comments

Top