लातूर: ही आहे स्वीडनची ग्रेटा थुनबर्ग. या विद्यार्थीनीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढा उभा केला. संसदेसमोर आंदोलन केलं. आम्हाला स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ पाणी द्या अशी मागणी तिनं केली. त्याला जगभर पाठिंबा मिळतोय. आज लातुरच्या श्रीकिशन सोमाणी आणि ज्ञानप्रकाश विद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करुन पाठिंबा दिला. लातुरात जनजागरण केलं. आज सकाळी दहाच्या सुमारास हे विद्यार्थी रॅलीने टाऊन हॉलच्या मैदानावर दाखल झाले. त्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. महापौर सुरेश पवार यांनी त्याला पाठिंबा दिला. शहर प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्यानं सर्वांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी टाऊन हॉल ते लोकमान्य टिळक चौक अशी मानवी साखळी तयार करुन वसुंधरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
Comments