HOME   टॉप स्टोरी

आमदारांना कॅमेर्‍याची भिती का वाटते?

हा कॅमेरा कुणाचा? आयोगाचा की खाजगी? कोणता कॅमेरा कुणाचा हेच कळत नाही!


लातूर: आमदार अमित देशमुख यांच्या बैठका सुरु आहेत. दररोज समाजातील विविध वर्गांशी संवाद साधत आहेत. परवा अशीच एक बैठक मार्केट यार्डात एका आडतीवर झाली. या बैठकीला बहुतांश आडते हजर होते. आमदार साहेबांचं भाषण सुमारे तीस मिनिटं झालं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याचं फेसबुकवर लाईव्हही केलं. हे सगळं सुरु असताना आजलातूरचे कॅमेरामन नितीन हांडे आपापलं काम करीत होते. लाईव्ह चालू होतं. मध्येच आमदारांना प्रश्न पडला निळ्या शर्टाचा हा कॅमेरामन कोण? मग कॅमेरामन म्हणाला आजलातूर. आमदार म्हणाले ते तेच का रवी जगताप? ब्रेकींगवाले? आजकाल कोणता कॅमेरा कुणाचा आहे ते कळत नाही. निवडणूक आयोगाचा की खाजगी समजत नाही. मला याबद्दल अधिक टिपण्णी करायची नाही...आमदारांच्या या वाक्यांवर जमलेले लोक हसले. आमदारांनी बैठक जिंकली! आमदारांना या कॅमेर्‍यांची भिती का वाटावी? त्यांची यंत्रणा त्यांचं लाईव्ह करीत आहे. लोक सगळं बघत आहेत. मग चित्रिकरण करणार्‍या कॅमेर्‍याबद्दल मनात प्रश्न का निर्माण व्हावा? जर शंकाच वाटत असेल तर बैठकीला कॅमेरेवाल्यांना परवानगीच देऊ नये आणि आपल्याच माणसांकडून होणारे लाईव्हही थांबवावे!


Comments

Top