HOME   टॉप स्टोरी

कराडांची माघार, भाजपाने काढला दसरा!

तुम्ही गोपाळ घ्या, आम्हाला गोविंद द्या, मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, कॉंग्रेसला वाट मोकळी!


कराडांची माघार, भाजपाने काढला दसरा!

लातूर: निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने दसरा काढला. शेकडो बंडोबांना थंड करीत निवडणुकीतील समझोता दुरुस्त केला. उमेदवारीत आलेली जळमटं साफ केली. लातूर ग्रामीण मतदारसंघातील भाजप नेते रमेश कराड यांनाही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले. संघाच्या एका विशेष आणि खास अधिकार असलेल्या नेत्याने ही समझोता एक्स्प्रेस रुळावर आणली. आमदारकीच कशाला हवी? त्यापेक्षा मोठी पदं आहेत. राज्यमंत्रीपदाचाही दर्जाही मिळू शकतो. अनेक महामंडळं आहेत. अनेक समित्या आहेत. तूर्त शांत रहा. कुठे ना कुठे सन्मानकारक पुनर्वसन होऊ शकतं. अशी समजूत काढली. मुख्यमंत्र्यांनीही आश्वस्त केलं. अखेर ग्रामीण मतदारसंघातील हा जाळ थंड झाला!
कुछ ले कुछ दे!
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने केलेली किमया ताजी आहे. तुम्ही लोकसभा घ्या आम्हाला विधानसभा द्या असा अलिखित करार झाला. ग्रामीण आणि शहर मतदारसंघ मोकळा झाला. शहरात भाजपाचा उमेदवार कमकुवत आहे पण त्यात वंचितची भर पडली हा अनपेक्षित अपघात कठीण आहे. पण ग्रामीणमध्ये कॉंग्रेसची वाट मोकळी झाली आहे. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सगळ्यांनी जागा वाटपाचा सौदा आधीच फायनल केला आहे. त्यामुळेच कराडांसारख्या जादू घडत असतात हे आता सगळ्यांनाच कळू लागले आहे.


Comments

Top