HOME   टॉप स्टोरी

अमित देशमुख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री!

त्यांच्या मंत्रीमंडळात मी असेन- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात


अमित देशमुख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री!

लातूर: संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेत विद्यमान सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे़. हा रोष २१ ऑक्टोबरच्या मतदानातून दिसून येणार आहे़. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (गवई), रिपाइं (कवाडे), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीची सत्ता आल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार अमित देशमुख होतील आणि मी त्यांच्या मंत्रीमंडळात असेऩ त्यामुळे लातूर शहरातून अमित देशमुख यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लातूर येथील युवकांच्या मेळाव्यात बोलताना केले़. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (गवई), रिपाइं (कवाडे), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अमित देशमुख व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित लातूर शहर व लातूर ग्रामीण युवक मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात बोलत होते़. यावेळी ज्येष्ठ नेते खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, अमित देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड़ व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, सिने अभिनेते रितेश देशमुख, धीरज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शेटे, ॲड़ राजेश खटके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, ॲड़ उदय गवारे, एऩडी़ सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती़. तरुणांचा प्रचंड उत्साह भरलेल्या या युवक मेळाव्यात बोलण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उठताच पावसाला सुरुवात झाली़, त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी अमित देशमुख व धीरज देशमुख यांच्यावर मतांचाही असाच पाऊस पडू द्या, असे आवाहन करुन पुढे म्हणाले की, युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे़ विकासरत्न विलासराव देशमुख यांचे कार्य, काँग्रेसचा विचार युवकांनी प्रत्येक मतदारापर्यं पोचवावा़. मतदानरुपी आशिर्वादातून महाराष्ट्राचे नेतृत्व अमित देशमुख यांच्या रुपाने पुढे येईल़. काँग्रेस महाआघाडीची सत्ता आल्यास ते मुख्यमंत्री होतील आणि मी त्यांच्या मंत्रीमंडळात असेन.
या युवक मेळाव्यात अभय साळूंके, सत्तार पटेल, प्रविण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले़. प्रारंभी काँग्रेस पक्षाच्या शपथपत्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़. मेळाव्यास ललितभाई शहा, ॲड़ विक्रम हिप्परकर, लालासाहेब चव्हाण, विजय निटूरे, मोहन सुरवसे, श्रीशैल उटगे, मनोज पाटील, शरद देशमुख, सुनिता अरळीकर, शीतल फुटाणे, सपना किसवे, विद्या पाटील, सोनाली थोरमोटे, सर्जेराव मोरे, हणमंत पवार, चंद्रकांत देवकते, संतोष देशमुख, सुपर्ण जगताप, अविनाश बट्टेवार यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती़.


Comments

Top