HOME   टॉप स्टोरी

दिशाहीन कॉंग्रेसच्या मागे जाऊ नका

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आवाहन, शैलेश लाहोटींना जिंकून देण्याची विनंती


लातूर: कॉंग्रेस दिशाहीन झाली आहे. हा पक्ष महाराष्ट्राला कशी दिशा देणार असा प्रश्न केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आज उपस्थित केला. लातुरच्या टाऊन हॉलच्या मैदानावर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. या सभेत शैलेश लाहोटी यांनी लातुरच्या आमदारावर आरोप केले. लातुरच्या पाणी टंचाईला आमदारांचे कारखाने जबाबदार आहेत असं ते म्हणाले. लातुरचा आमदार भाजपचाच होईल असा विश्वास पालकमंत्री संभाजी पाटील यांनी व्यक्त केला. टाऊन हॉलच्या मैदानावर ही सभा झाली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.


Comments

Top