लातूर: काल झालेल्या टाकेनगरातील अमित देशमुख यांच्या प्रचार सभेत माजी महापौर दीपक सूळ यांनी विलासरावांची संबोधना अल्ला म्हणून केली. अमित देशमुखांना त्यांनी पैगंबर संबोधलं. यामुळं मुस्लीम धर्मप्रचारक आणि मुस्लीम बांधव खवळले आहेत. भावना काहीही असली तरी कुणाच्याही धर्मातील वंदनीय व्यक्तींच्या नावांशी छेडछाड करण्याचा अधिकार कुणालाही नाही. ही बाब स्पष्ट असतानीही वकील असणार्या दीपक सुळांकडून हा प्रकार घडल्याने भावना संतप्त झाल्या आहेत. या विरोधात आज आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Comments