HOME   टॉप स्टोरी

पोलिसांकडून लाखांची दारु जप्त

दारु कुणाची होती? कुठे चालली होती ते मात्र गुलदस्त्यात!


लातूर: मतदानाला एकच दिवस बाकी असताना काल शिवाजीनगर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर देशी आणि विदेशी दारु जप्त केली. ही दारु कुणाची होती आणि कुठे चालली होती हे मात्र कळू दिले नाही. या प्रकरणात सातजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाजी चौकात एका दुकानाजवळ एक इनोव्हा पकडण्यात आली. या गाडीतून ४२ हजार ७२० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणात शरण कांबळेला अटक करण्यात आली. पीएसाआय राजाभाऊ घाडगे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. अंबाजोगाई मार्गावर अपना बाजार परिसरात विस्टा कारमधून ५७ हजार ६०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. एजाज अब्बास शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्यानेही दारु घेऊन जाणार्‍या पाचजणांना पकडले. प्रचार काळात आणि संपल्यावरही अशा दारुकामावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.


Comments

Top