HOME   टॉप स्टोरी

०२ हजार १३ मतदान केंद्रांवर मतदान

सततच्या पावसामुळे लातुरात मतदान मंदगतीने सुरु


०२ हजार १३ मतदान केंद्रांवर मतदान

लातूर: आज सकाळी सात वाजता पावसामुळे मतदानाची प्रक्रिया अतिशय मंदगतीने सुरु झाली. रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने मतदारांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. आज सकाळी अनेक मतदान केंद्रांचा आढावा घेतला. अनेक केंद्रांवर पाच दहा पेक्षा अधिक मतदार दिसले नाहीत. अजून तरी मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत न भिजता आणण्याचा प्रयत्न कुणी केलेला दिसला नाही. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण ०२ हजार १३ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
०२ हजार १३ मतदान केंद्रावर मतदान
जिल्ह्यात एकूण ०२ हजार १३ मतदान केंद्रे असून यामध्ये 234- लातूर (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघात 356 मतदान केंद्रे, 235- लातूर (शहर) 334 मतदान केंद्रे, 236-अहमदपूर विधानसभा मतदारसंघात 356 मतदान केंद्रे, 237-उदगीर (अ.जा.), 321 केंद्रे, 238- निलंगा 342 मतदान केंद्रे व 239- औसा 304 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होत आहे
१९ लाख १५ हजार ९१८ मतदार
विधानसभा निवडणुकीमध्ये सहा विधानसभा मतदारसंघात एकूण १९ लाख १५ हजार ९१८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 234 लातूर (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघात 3 लाख 22 हजार 330 मतदार असून 1 लाख 69 हजार 504 पुरुष तर 1 लाख 52 हजार 467 महिला मतदार, इतर 1 व सैनिक मतदार 358, 235 लातूर (शहर)- एकूण मतदार 3 लाख 72 हजार 474 एवढी असून 1 लाख 94 हजार 376 पुरुष तर 1 लाख 77 हजार 992 महिला मतदार, इतर 1 व माजी सैनिक 105, 236 अहमदपूर एकूण 3 लाख 21 हजार 327 मतदारांपैकी 1 लाख 70 हजार 192 पुरुष तर 1 लाख 50 हजार 291 महिला मतदार,व सैनिक मतदार 844, 237-उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 99 हजार 139 मतदार असून यामध्ये 1 लाख 58 हजार 260 पुरुष तर 1 लाख 40 हजार 179 महिला मतदार,व सैनिक मतदार 700, 238- निलंगा- विधानसभा मतदारसंघात 3 लाख 16 हजार 690 एवढे मतदार असून यापैकी 1 लाख 66 हजार 928 पुरुष तर 1 लाख 49 हजार 363 महिला मतदारांची संख्या असून इतर 1 सैनिक मतदार 398, व 239-औसा- विधानसभा मतदारसंघात 2 लाख 83 हजार 958 एवढे मतदार असून यापैकी 1 लाख 50 हजार 746 पुरुष तर 1 लाख 32 हजार 715 महिला मतदारांची संख्या असून व सैनिक मतदार 497 आहेत.
०२ हजार ९८ दिव्यांग मतदार
जिल्ह्यात एकूण ०२ हजार ९८ दिव्यांग मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाच्यावेळी दिव्यांगांना अडचण होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर दिव्यांगांना आवश्यक त्या सर्व सुविधाही पुरविण्याची तयारी करण्यात आली आहे.


Comments

Top