HOME   टॉप स्टोरी

दोन दिवसात होऊ शकतो मुसळधार पाऊस

काळजी घेण्याचे आवाहन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज


दोन दिवसात होऊ शकतो मुसळधार पाऊस

लातूर: जिल्ह्यात येत्या दोन दिवसात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहे. यासाठी नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवून दर तासाने पडणाऱ्या पावसावर तसेच काही हानी झाल्यास त्याबाबतची माहिती देणारे संदेश जिल्हाधिकारी कार्यालयास वेळेत देण्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे, शेतकऱ्यांनी दुपारी ०३ ते ०७ या वेळेत शेतीची व इतर कामे करू नयेत, या कालावधीत वीज पडण्याची शक्यता जास्त असते तसेच इतर जनावरे झाडाखाली पाण्याच्या स्त्रोताजवळ, विजेच्या खांबांजवळ बांधून न ठेवता त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे, आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, जलसाठयाजवळ-नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठयावर-नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे, पुलावरून पाणी वाहत असताना कोणी स्वतःहून वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, पूरप्रवण क्षेत्रात कोणी जाऊ नये, पाऊस सुरू असताना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी करावी, या बाबतीत ग्रामस्तरावरील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहाय्यक यांनीही सावधगिरी बाळगावी तसेच लोकांनाही सावधगिरी पाळण्याचे सूचना देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे अपर जिल्हा दंडाधिकारी अविनाश पाठक यांनी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी आवाहन केले आहे.


Comments

Top