लातूर: तुम्ही एखादं वाहन बेशिस्तपणे लावलं तर पोलिस काय करतील? नक्कीच कारवाई करतील, मग तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीला फोन लावाल. पुन्हा बाचाबाची होईल. दंड कमी अधिक होईल. दुसरं टोईंग वाहन येईल, जामर लावेल किंवा वाहन उचलून नेईल. पुन्हा फोनाफोनी, बाचाबाची आलीच. पण गंजगोलाईत असं काही झालेलं दिसलं नाही. पोलिसांनी समंजसपणे बेशिस्त वाहने स्वत: उचलून शिस्तीत लावली. वाहनधारकांवर आरडाओरड केली नाही. कुणालाच कारवाईची धमकी दिली नाही. लातुरच्या पोलिसांचा हा चांगुलपणा लक्षात ठेवावाच लागेल. कारण गंजगोलाईत मनपाचे प्रशासन पूर्णत: ढेपाळलेले असताना, मनपाचे ओझे पोलिस खांद्यावर घेऊन फिरत आहेत!
Comments