HOME   टॉप स्टोरी

पावसाळ्यात रुसला, दिवाळीत बरसला

लातूर जिल्ह्यात नव्वद टक्के पाऊस, मांजरात वर्षभराचा साठा


लातूर: लातूर जिल्ह्यात नेहमीप्रमाणे पावसाने गोंधळ घातला. वेळेवर आलाच नाही. आला तो परतीच्या रुपाने. दिवाळीच्या आसपास पाऊस धो धो बरसला. आज दोनदा आला. आजवरची टक्केवारी नव्वदवर पोचली आहे. मांजरा धरणात ३४.१४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. हे पाणी पुढच्या सप्टेंबरपर्यंत पुरु शकते. दरम्यान साई आणि नागझरी बंधार्‍यातून ऊसासाठी पाणी उपसा होऊ नये ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Comments

Top