लातूर: भाजप शासनाच्या धोरणाविरुध्द म्हणजे ढासळती अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारीची वाढते प्रमाण आणि शेतकऱ्यांना संकट समयी होत नसलेल्या मदतीबद्दल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने तहसील कार्यालय लातूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनामध्ये लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकारी, आजी व माजी नगरसेवक-नगरसेविका, बुथ समन्वयक, महिला काँग्रेस विभाग, अनुसूचित जातीजमाती विभाग, ओबीसी काँग्रेस विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, एनएसयूआय, काँग्रेस सर्व सेलचे पदाधिकारी, विलासराव देशमुख युवामंच, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव बेद्रे यांनी केले होते. भाजपकी सरकारको एक धक्का मार दो! अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या.
Comments