HOME   टॉप स्टोरी

उप महापौरांनी टाकल्या धाडी!

अनेक विभागातील अधिकारी गायब, कर्मचारीही जेमतेम उपस्थित


लातूर: लातूरचे उप महापौर देवीदास काळे यांनी आज दुपारी चार वाजता अचानक धाडसत्र सुरु केलं. महानगरपालिकेतील सगळ्या प्रमुख विभागातील अधिकार्‍यांची माहिती घेतली. बहुतांशजण उपस्थित नव्हते. बैठकीला गेले असं सांगण्यात आलं. पण कुठली बैठक होती हे अनेकांना सांगता आलं नाही. त्या त्या विभागात अधिकार्‍यांच्या दैनंदिन कामांबाबत नोंद नव्हती. नागरिक अडले होते, कामे ठप्प होती. उप महापौर देवीदास काळे यांनी कर्मचार्‍यांना फैलावर घेतलं. सोबतीला प्रशासकीय अधिकारी रमाकांत पिडगे, नगरसेवक सुनील मलवाडही उपस्थित होते. उप महापौरांनी केलेली अलिकडची ही दुसरी कारवाई आहे. यामुळे सुधारणा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


Comments

Top