लातूर: जिल्हा प्रशासन लातूर व लातूर शहर महानगरपालिका लातूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित पाणी परिषदेच्या जनजागृतीसाठी आयोजित मॅरेथॉन रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन पाणी टंचाईवर मात करु असे जिल्हाधिकारी म्हणाले. पाणी समस्येमुळे, टंचाईमुळे लातूर शहर व जिल्हा बदनाम झालेला आहे. हा कलंक आपण सर्वजण मिळून पुसून टाकू व येणार्या पिढीसाठी ही पाणी समस्या राहणार नाही याची दक्षता आपण घेऊ असे जिल्हाधिकारी म्ह्णाले. या प्रसंगी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पाणी परिषद आयोजनाबाबत जिल्हाधिकारी जी श्रीकांत व मनपा आयुक्त एमडी सिंह यांचे अभिनंदन केले. पाणी समस्या-टंचाईवर सर्व पदाधिकारी आपल्या सोबत आहेत अशी ग्वाही दिली. सर्व लातूरकरांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. जिल्हाधिकारी आणि महापौरांनी बाला गाण्यावर व्यायामपूर्ण डान्सही केला.
नाना-नानी पार्क ते क्रीडा संकुल या दरम्यान आयोजित मॅरेथॉन रॅलीसाठी शाळा, महाविद्यालय व शहरातील जवळपास एक हजार नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये अनुक्रमे अंकुश रामराव चव्हाण (पहिला), परशुराम नागेश कु-हडे (दुसरा), हर्षल सहदेव ओहाळ (तिसरा), पंकज आनंता भोसेकर (चौथा) तर मुलीमध्ये अनुक्रमे प्रतिक्षा शामसुंदर कसबे (पहिली), ममता श्रीकांत देवरे (दुसरी), प्रज्ञा निळकंठ वाळके (तिसरी), राजनंदीनी गंगाधर सोमवंशी (चौथी), निकीता बस्वराज आग्रे (पाचवी) यांचा नंबर आला. ६० वर्षावरील वयोगटात दयानंद आर्य तर महिला मध्ये अरूणा पवार यांनी अग्र क्रमांक पटकावला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
Comments