लातूर: लातुरचे नवे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आज पदभार स्विकारला. त्यांचं प्रचंड स्वागत झालं. विविध स्तरातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शहरात सर्वांना समान न्याय देऊ, लातुरला पाण्यासाठी स्व्यंपूर्ण करु, दुष्काळग्रस्त लातूर ही ओळख पुसून टाकू, लातुरकरांच्या सूचना लक्षात घेऊनच धोरणे राबवू, घनकचरा व्यवस्थापन आधुनिक करु, लातुरकरांनी संयम बाळगावा काही कटू निर्णय घ्यावे लागतील, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊ, मनपा कर्मचारी खूप चांगले आहेत त्यांचे मनोबल वाढवू, जनतेला विश्वासात घेऊनच कर आकारणी करु, मनपाच्या खर्चात कपात करु, अमृत योजनेतली अनेक कामे अपूर्ण आहेत गुत्तेदारावर फौजदारी दाखल करु, लातुरकरांच्या इच्छेनुसार पाण्याचे कर लावू, ३० दिवसात लातूर चिकन गुनिया आणि डेंग्यूमुक्त करु, गंजगोलाईच्या सुशोभिकरणाचा आराखडा तयार आहे त्यासाठी सरकारकडून निधी आणू, लातुरला पुन्हा वैभवशाली करु असं महापौर आणि उप महापौरांनी सांगितलं
राजा मनियारांचे आभार
राजा मनियार यांनी साथ दिल्यामुळेच मनपात सत्ता बदल झाला. याचा चांगला उल्लेख महापौरांनी केला. वारंवार केला. असे असेल तर आणखी एक उप महापौरपद तयार करुन त्यावर मनियारांची नियुक्ती का करीत नाही? असा प्रश्न आजलातूरने केला. अशी संवैधानिक तरतूद नाही असं महापौर गोजमगुंडे म्हणाले. पण पुण्यासारख्या ठिकाणी अनेक उपायुक्त आहेत याची आठवण रवींद्र जगताप यांनी करुन दिली.
Comments