HOME   टॉप स्टोरी

ठाकरे सरकार जिंकले, भाजपचा सभात्याग

चारजण राहिले तटस्थ, शिरगणतीने झाली मत मोजणी


ठाकरे सरकार जिंकले, भाजपचा सभात्याग

मुंबई: महा विकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज जिंकले. विधानसभेत शिरगणतीने मतदान झाले. या सरकारला १६९ मते मिळाली. भाजपाने सभात्याग केला. चार सदस्य तटस्थ राहिले. यात एमआयएम आणि मनसे सदस्यांचा सहभाग होता. मी रिकाम्या मैदानात लढणारा नाही, शत्रुला अंगावर घेणारा आहे. आई वडील, शिवरायांचं नाव प्रत्येक जन्मात घेत राहीन, हा जर गुन्हा असेल तर मी तो कायम करीत राहीन अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली. बहुमत चाचणीसाठी बोलावलेलं हे अधिवेशन नियमबाह्य आहे, हंगामी अध्यक्ष बदलणंही गैर आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. सभागृहाचं कामकाज वंदे मातरेमनं सुरु व्हायला हवे होते असंही ते म्हणाले.
राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार बहुमत आजमावणी करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. आज सभागृह सुरू झाल्यानंतर सुरुवातीचं कामकाज झाल्यानंतर सदस्य अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासाचा ठराव मांडला. सत्ताधारी आमदार नवाब मलिक, जयंत पाटील व सुनील प्रभू यांनी त्याला अनुमोदन दिलं. या प्रक्रियेनंतर आवाजी मतदान घेऊन शिरगणतीद्वारे मतदान घेण्यात आले. सर्व सदस्यांची मतं जाणून घेण्यात आली. ही प्रक्रिया होताच भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. अध्यक्षांनी सूचना केल्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. सदस्यांची मोजणी करण्यात आली. सरकारला १६९ मतं मिळाली. भाजपाच्या सभत्यागामुळे विरोधात शून्य मते पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माकपचे प्रत्येकी एक आणि एमआयएमचे दोन असे चार सदस्य तटस्थ राहिले. सभागृहात सरकार जिंकले आहे. ते किती काळ टिकते याकडे सर्वांचे लक्ष आहे.


Comments

Top