लातूर: समाजात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब सोशल मिडीयात उमटत असते. अनेकदा नेटकरी त्याची खिल्ली उडवतात, मजा घेतात. कांद्याच्या वाढणार्या भावाचा असाच मजाक चालू आहे. वेगवेगळे मजेशीर व्हिडीओही व्हायरल होत आहेत. ही पोस्ट वाचा. व्हिडीओही पहा.
रात्री मला घरी यायला 11 वाजले.
अंधार खूप होता, भीती वाटत होती.
त्यात कुत्रे भुंकत होते.
सगळी कडे बघावं तर अंधारच अंधार आणि मी पायी चालत होतो.
तेवढ्यात एक युक्ती सुचली मी मोठ्याने ओरडलो कांदे 5 रुपये किलो.
सगळ्यांनी बाहेरचे लाईट लावले व कांदेवाल्याला शोधू लागले, मी उजेडात घरी आलो.
Comments