आजलातूर: लातूर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. बर्याचदा समाजकंटक गोवंश रात्रीतून उचलूनही नेतात. ही जनावरे रस्ता वाहतुकीत अडथळा आणतात. शहरातल्या कोंडवाड्यात प्लास्टीकचा कचरा साठवला जातो. जनावरे मात्र रस्त्यांचा आधार घेतात. नव्या कोंडवाड्याबाबत मनपाही काही बोलायला तयार नाही. अशा काळात गोवंश संवर्धनासाठी काम करणार्या मंडळींकडून अपेक्षा केली जाते. ही जनावरे सांभाळण्याची जबाबदारी वीर योद्धा संघटनेने दाखवली आहे. त्यासाठी एखादा हरित पट्टा द्यावा. त्याचीही देखभाल केली जाईल. जे जनावर मालक आहेत त्यांच्याकडून मनपाच्या नियमानुसार शुल्क आकारले जाईल. ते मनपाकडेच जमा केले जाईल. या कामासाठी लागणारा कर्मचारी वर्ग वीर योद्धा संघटना विनाशुल्क पुरवायला तयार आहे. असा प्रस्ताव यापूर्वीही दिला होता आताही दिला आहे. अशा संस्थांना अशी कामे दिल्यास हरित पट्टेही जिवंत राहतील. मनपाचीही कामे विनाशुल्क होतील आणि शहराची समस्याही दूर होईल अशी भावना व्यक्त होत आहे.
Comments