आजलातूर: नव्या नागरिकता दुरुस्ती कायद्याला देशभरातून अनेक ठिकाणांहून विरोध होत आहे. लातुरातही अनेक आंदोलने झाली, होत आहेत. आज लातूर तहसील कार्यालसमोर तहरिक ए इन्किलाब पक्षाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी या कायद्याला विरोध करीत मुंडन करुन घेतले. हा कायदा देशाच्या घटनेच्या विरोधात आहे, लोकशाही विरोधी आहे असा आरोप अॅड. मिहम्मद अली यांनी केला. कार्यकर्त्यांचे कापलेले केस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी शाह होश मे आवो अशा घोषणा जमलेल्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
Comments