HOME   टॉप स्टोरी

भव्य रॅलीने केले नागरिकत्व कायद्याचे समर्थन

आंदोलकांनी मिरवला भव्य तिरंगा, शिवाजी चौकात झाली सांगता


लातूर: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात काल निघालेल्या भव्य मोर्चाला आज लातुरात भव्य रॅलीने उत्तर दिले. दुपारी बाराच्या सुमारास ही रॅली टाऊन हॉल मैदानवरुन निघाले. अनेक कार्यकर्त्यांच्या हातात तिरंगा आणि भगवा झेंडे होते. गोली मारो सालों को देश के गद्दारो को, मोदी मोदी, वंदे मातरम, हमे चाहिए आजादी, दहशतवाद से आजादी अशा घोषणा आंदोलक देत होते. रॅलीत भला मोठा लांबच लांब तिरंगा आंदोलकांनी डोक्यावर घेतला होता. उड्डाण उलावरुन अनेकांनी या रॅलीवर पुष्पवृष्टी केली. आ. संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे या रॅलीत सहभागी झाले होते. शिवाजी चौकात रॅलीचा समारोप झाला.


Comments

Top