लातूर: आज या वर्षातलं शेवटचं ग्रहण, कंकणाकृती सूर्य ग्रहण. ते विद्यार्थी आणि नागरिकांना पाहता यावं, त्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत, वैज्ञानिक दृष्टीकोन तयार व्हावा यासाठी लातुरातील काही सामाजिक संस्था, खाजगी महाविद्यालये, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. क्रीडा संकुलावर किमान दोन हजार विद्यार्थ्यांना हे ग्रहण पाहता यावं याची व्यवस्था केली होती. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते त्यामुळे हे सूर्य ग्रहण संपूर्णपणे पाहता आले नाही. ढागाआड लपलेल्या सुर्याने काही क्षण दर्शन दिले. सुर्याची कोर पाहता आली. त्या आधी ग्रहण काय असते, ती खगोलीय प्रक्रिया आहे, त्याबाबतचे गैरसमज कसे चुकीचे आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.
Comments