HOME   टॉप स्टोरी

शरद पवारांमुळेच आमदार अन मंत्री- संजय बनसोडे

लोकनेते विलासरावांच्या स्मृतीस्थळी अभिवादन, महापुरुषांच्या पुतळ्यांनाही आदरांजली


लातूर: लातूर जिल्ह्याचे सुपुत्र उदगीरचे राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्यमंत्री संजय बनसोडे आज आणि उद्या लातुरात आहेत. भरगच्च कार्यक्रमात ते व्यस्त आहेत. लातुरात येताच त्यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना आदरांजली अर्पण केली. बाभळगावात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या समाधीस्थळी त्यांनी माथा टेकवला. शरद पवार यांच्यामुळेच आपण आमदार आणि मंत्री झालो. भविष्यात जनसामान्यांच्या कल्याणासाठी काम करीत राहू अशी ग्वाही बनसोडे यांनी आजलातुरशी बोलताना दिली. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष व्यंकटराव बेद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, लातूर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रशांत पाटील, प्रदीप गंगणे, अरविंद कांबळे, बबन भोसले यांच्यासह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top