लातूर: बोरवटीच्या नम्रता साळुंकेचा विवाह सहा महिन्यांपूर्वी लातुरच्या प्रकाशनगरातील मनोज घोरपडे याच्याशी झाला होता. फायनान्स सुरु करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा छळ सुरु होता. परवा तिला बेदम मारहाण करण्यात आली. ती बेशुद्ध पडली. ती मरण पावली असे समजून सासरच्यांनी तिला अंबाजोगाई मार्गावरील रेल्वे रुळावर आणून टाकले. तिचा विव्हळण्याचा आवाज ऐकून तिला दवाखान्यात नेले पण तोवर तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न तिच्या माहेरकडची मंडळी करीत होती पण फारशी दाद मिळाली नाही. अखेर बोरवटीकरांनी काल संध्याकाळी रस्त्यावर उतरुन रस्ता जाम केला. बराच काळ वाह्तूक ठप्प होती. पोलिसही आले. त्यांनी गर्दी आवरण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. नम्रताचे वडील वडील बब्रुवान साळुंके गरीब शेतकरी आहेत. त्यांनी लग्नात तीन लाखांचा हुंडा, मानपान करीत लग्न लावून दिले होते. लातुरचे पोलिस उपाधिक्षक सचिन सांगळे यांनी नम्रताच्या नातलगांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु होती.
Comments