HOME   टॉप स्टोरी

औषध विक्रेता प्रतिनिधींचा मोर्चा

देशव्यापी बंदला पाठिंबा, मोठा सहभाग


लातूर: देशव्यापी बंदमध्ये अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. लातुरातही त्याला प्रतिसाद मिळाला. पण वेगवेगळ्या ठिकाणी काम करणार्‍या संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करण्यापेक्षा आपापल्या पद्धतीने आंदोलने केली. पोस्टासमोर तिथले कर्मचारी, महाराष्ट्र बॅंकेसमोर बॅंक कर्मचार्‍यांनी निदर्शने केली. औषध विक्रेता प्रतिनिधींनी शहरातील मुख्य मार्गावरुन मोर्चा कम रॅली काढली. जुनी पेन्शन योजना सुरु करावी, सरकारी, निमसरकारी, सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवावे, प्रशिक्षणार्थी कामगारांना नियमित करावे, कामगार कायद्यातील कामगारविरोधी आणि मालकधार्जिणे धोरण रद्द करावे, मनपातील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या एका वारसास शान सेवेत सामावून घ्यावे, वीज महामंडळ, सार्वजनिक परिवहन, पोस्टल, कोळसा खाणी, उद्योगांना संरक्षण द्यावे, रेल्वे, बंक, विमा, संरक्षण आणि औषध व्यापारी क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीचे धोरण रद्द करावे, कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा लाभ द्यावा आणि पदोन्नतीचा लाभ द्यावा, इलेक्ट्रीसिटी कायदा २०१८मागे घ्यावा अशा एकूण २६ प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.


Comments

Top