HOME   टॉप स्टोरी

पॉपकॉर्न, शेंगादाणे अन कॉंबो पॅकचा पीव्हीआरला आधार

भरमसाठ तिकिट असतानाही प्रेक्षकांच्या माथी ही सक्ती कशाला? घेतात गर्दीचा फायदा!


लातूर: पीव्हीआर हे लातुरातील पहिले मल्टीप्लेक्स. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आजही मिळतोच आहे. अनेक चित्रपटांना गर्दी उसळत असते. या गर्दीचा फायदा घेऊन या पीव्हीआरवाल्यांनी वेगळच धंदा सुरु केला आहे. गर्दी दिसली दिसली की तिकीट काढणार्‍यांच्या माथी कधी पॉपकॉर्न, कधी शेंगादाण्याचे पाकीट तर कधी कॉंबो पॅक मारला जातो. आज सकाळच्या खेळाला गर्दी असल्याने प्रेक्षकांच्या माथी शेंगादाण्याची पाकिटे मारली गेली. त्याचे पैसे वेगळे घेतले जातात. याच्या सेवनाने प्रेक्षकांना काही त्रास झाला तर कोण जबाबदार? प्रेक्षकांना घरुन-बाहेरुन काही आणता येत नाही. मग यांनी दिलेल्या पदार्थांची काय खात्री? काही जाणकार प्रेक्षक या पदार्थाची सक्ती नाकारतात. पण नवखे , बाहेरुन आलेले प्रेक्षक त्याला बळी पडतात.


Comments

Top