HOME   टॉप स्टोरी

शोभा गोमारे यांचा गांधी चौकात आत्मदहनाचा प्रयत्न

अतिक्रमणच्या विरोधात वर्षभरापासू प्रयत्न, निराशेतून कृत्य


लातूर: लातुरच्या सामाजिक कार्यकर्त्या, प्रसिध्द विधिज्ञ शोभा गोमारे-दुड्डे यांनी आज लातुरच्या गांधी चौका आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थितांनी त्यांना वाचवलं. नंतर गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणलं. प्रतिबंधात्मक उपा म्हणून ताब्यात घेतलं.
गोमारे राहतात त्या नारायणनगर भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली आहेत. अनधिकृत बांधकामेही वाढली आहेत. आता तर त्यांच्या पाठभिंतीलाही असे प्रयोग सातताने सुरु आहेत. याबाबत त्यांनी अनंतवेळा, अनंत ठिकाणी तक्रारी दिल्या. पण कुठूनच मिळाली नाही. मनपाचे अधिकारी सोयीने डोळेझाक करतात, माध्यमे प्रतिसाद देत नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे.


Comments

Top