लातूर: लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नाट्यगृहाचं बांधकाम सुरु आहे. या नाट्यगृहाला स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव द्यावं यासाठी भाजपाचे नगरसेवक आग्रही आहेत. त्यांनी आज तशी बैठकही घेतली. उद्या कागदपत्रे घेऊन जिल्हाधिकार्यांनाही भेटणार आहेत. लातुरचे ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी स्व. श्रीराम गोजमगुंडे यांचं नाव या नाट्यगृहाला द्यावं असा ठराव मनपाने केला आहे. यावेळी भाजपा सदस्यांनी सभात्याग केला होता. विरोध होताच तर मग सभागृहावर बहिष्कार का टाकला असा प्रश्न उप महापौर चंदकांत बिराजदार यांनी केला आहे. या प्रकरणाचा शेवट काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments