लातूर: शहराचा जमवला जाणार्या वरवंटी कचरा डेपोला नेहमी आगते प्ण हे दिवस आगीचे नाहीत. ही आग लागली नसूब लावली गेली आहे असा आरोप नांदगावचे सरपंच महादेव ढमाले यांनी केला आहे. आज मोठ्या प्रमाणावर कचरा धुमसत होता. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळासह, महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी दूर्लक्ष करीत आहेत असाही आरोप केला जात आहे. कचर्याच्या एखाद्या ढिगाला आग लागू शकते. सगळ्या डेपोलाच आग लागण्याचे कारण नाही. आज पसरलेल्या धुरामुळे आम्हाला गावाकडे जाणे मुश्कील झाले आहे. महापालिकेने आम्हाला मारण्याची सुपारी घेतली आहे की कय अशी शंका येते. अशाच पद्धतेने राजकारण चालू राहिले तर उद्यापासून कचर्याची एकही गाडी येऊ देणार नाही असा इशारा महादेव ढमाले यांनी दिला आहे. यावेळी अनेक संतप्त ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments