HOME   टॉप स्टोरी

प्लास्टीक बंदीला व्यापार्‍य़ांचा विरोध, दुकाने बेमुदत बंद

बंदीसाठी किमान दोन महिन्यांची मुदत द्यावी, बेरोजगारी अणि कर्जाचं काय?


लातूर: प्लास्टीक, त्यापासून बनणार्‍या वस्तू, डिस्पोजेबल वस्तू या सार्‍यांवर बंदी आली आहे. या बंदीचा व्यापार्‍यांनी विरोध आणि निषेध केला आहे. दुकाने बंद करुन या रकारचे डोके फिरले आहे काय अशा आशयाचे पोस्टर्स लवण्यात आहेत. प्रत्येक व्यापार्‍य़ाकडे दहा ते १५ लाखांचा माल शिल्लक आहे. शिवाय बँकांचे कर्ज आहे. नोटबंदीच्या वेळी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी दिला होता. असा कालावधी आता का दिला नाही असा प्रश्न या व्यापार्‍यांनी केला आहे. या निर्णयामुळे लातूर शहरातील ४ हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. सरकारने या व्यापार्‍यांना ०१ महिन्यांत आपला माल परराज्यांमध्ये नेऊन विकण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो पण सरकारने आम्हाला ठराविक कालावधी द्यायला हवा होता. हा माल विकता तरी आला असता किंवा त्या संबधीत व्यापार्‍यास आम्ही तो माल परत केला असता असे सांगण्यात आले. यावेळी गोपाळ हरियाणी, राजू बट्टेवार, अ‍ॅड. राहूल पंपटवार, साईनाथ पंपटवार, वाजीद शेख, अशोक शिंदे उपस्थित होते.


Comments

Top