HOME   टॉप स्टोरी

स्कायलॅब कोसळली लातुरच्या उड्डाण पुलावर!

दिवसभर अफवा, सोशल मिडियावर धुमाकुळ, स्कायलॅब कोसळली पॅसिफिक महासागरात


लातूर: आज पहाटेपासूनच चिनी स्कायलॅबने (अंतराळ प्रयोगशाळा) लातुरात गोंधळ सुरु केला. २०१६ साली चीनच्या संपर्कातून भरकटलेली ही प्रयोगशाळा मुंबईवर कोसळणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यातच कुणी महाभागाने एक उड्डाण पुलावरचा व्हिडीओ व्हायरल केला. तो पुढे व्हायरल होत राहिला. परिणामी वर्तमानपत्रे आणि सरकारी कार्यालयातील फोन खणखणत राहिले. प्रत्यक्षात मात्र असे काहीच घडले नव्हते. उड्डाण पुलावर नेहमीसारखी रहदारी सुरु होती.
मुंबई - चीनची प्रयोगशाळा मुंबईवर कोसळण्याचे संकट टळले आहे. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चिनी स्पेस स्टेशनचे तुकडे होऊन ते पॅसिफिक महासागरात कोसळले.
ही चिनी प्रयोगशाळा रविवारच्या पहाटे म्हणजे सोमवारच्या सकाळी पाच वाजून १६ मोनिटांनी दक्षिण पॅसिफीक महासागरात कोसळली. या प्रयोगशाळेचा आकार ३४ फूट लांब आणि ११ फूट रुंद होता. नऊ टनापेक्षा अधिक वजन असलेल्या या प्रयोगशाळेचा आकार एखाद्या स्कूल बसपेक्षा मोठा होता. ही लॅब मुंबई, आंध्रप्रदेश, बंगालचा उप सागर अशा पट्ट्यात पडण्याची शक्यता होती. १९७९ सालीही अशाच स्कायलॅबने गोंधळ उडवला होता.


Comments

Top