HOME   टॉप स्टोरी

महामार्ग विरोधातले आंदोलन तूर्तास थांबले, शेतकर्‍यांचे एक पाऊल मागे

महामार्गात जाणार्‍या जमिनीचा योग्य मोबदला देण्याचे आश्वासन, न दिल्यास काम थांबवणार


लातूर: रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत झाल्या. त्यांना योग्य पद्धतीने मावेजा दिला जात नाही, या रागापोटी शेतकर्‍यांनी रविवारपासून आंदोलन सुरु केले होते. उजनी, आशिव भागातील शेतकर्‍यांनी महामार्गाचे काम थांबवले होते. काल माजी आमदार दिनकर माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन गार्‍हाणे मांडले. प्रशासनाने त्यांची बाजू ऐकून घेतली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ साठी उजनी ते औसापर्यंत ८५ हेक्टर जमीन संपादित केली असून जमीन संपादित झालेल्या शेतकर्‍यांना कोष्टक ३६ अ प्रमाणे मावेजा मिळत नाही. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकर्‍यांनी अनेक वेळा सरकारचे दार ठोठावले होते.


Comments

Top