HOME   टॉप स्टोरी

आसारामबापूंची जादू कायम, सत्संगात बापूंचेच कौतुक

जोधपूर जेलची सकाळ होते प्रार्थनेने, बापू दिवसभर करतात प्रवचन


लातूर: बलात्काराच्या आरोपाखाली जोधपूर कारागृहात असलेले आसारामबापू यांची जादू अजूनही तशीच दिसते. जोधपूर कारागृहात रोज अनेकजण त्यांना भेटायला जातात. राजस्थानचे पोलिस तर त्यांना देव मानतात अशी माहिती बापूंच्या शिष्या साध्वी लिना बहन यांनी दिली. बापूंच्या वाढदिवसानिमित्त योग वेदांत सेवा समितीने टिळक गार्डन येथे गीता भागवत सत्संगाचे आयोजन केले होते. साध्वींच्या रसाळ, ओघवत्या वाणीने सगळे वातावरण भक्तीमय झाले होते. गीता-महाभारतातील प्रसंगांचे दाखले देत लिना बहन यांनी आसारामबापू यांचीही महती सांगितली. बापूंना भेटायला जोधपूर जेलमध्ये रोज हजारो साधक येतात. काही वेळा तर पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. राजस्थानात देवाला दाता म्हणतात. बापूंना पोलिसही दाताच म्हणतात. बापुमुळे या कारागृहात रोज सकाळी प्रार्थना होते. चालता-बोलता बापू प्रवचन देत असतात असे साध्वींनी सांगितले.
साध्वी मंचावर आल्याबरोबर त्यांनी बापूंच्या प्रतिमेचे पूजन केले, एक भजन सादर केलं आणि प्रवचनाला सुरुवात केली.


Comments

Top