HOME   टॉप स्टोरी

लातूर वकील मंडळाच्या अध्यक्षपदी आर वाय शेख

लातूर वकील मंडळावर अण्णाराव पाटील यांच्या पॅनलचे प्रभुत्व, दोन बिनविरोध


लातूर वकील मंडळाच्या अध्यक्षपदी आर वाय शेख

लातूर: प्रतिष्ठेची समजली जाणारी लातूर वकील मंडळाची निवडणूक निकराने लढवली गेली. या निवडणुकीत आर वाय शेख यांची अधयक्ष म्हणून निवड झाली. या निवडणुकीत तीन पॅनल्सनी एकमेकांशी टक्कर दिली. अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांच्या पॅनलने आपले प्रभुत्व सिद्ध केले. महिला सह सचिव हर्षला जोशी आणि महिला उपाध्यक्ष सुनंदा इंगळे या दोघी बिनविरोध निवडून आल्या.
आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत मतदानाची मुभा होती. लातूर वकील मंडळाच्या १२२२ मतांपैकी ८९४ मतदान झाले. अध्यक्षपदी निवडून आलेले आर वाय शेख यांना ४६६, उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले कैलास अनसरवाडेकर यांना ३४३, सचिव शिवशंकर भुजबळ यांना ४५८, सहसचिव श्रीकांत मोमले यांना ४९७, कोषाध्यक्ष मिलिंद दंडे यांना ३३७ तर ग्रंथालय सचिव रवी पिचारे यांना ३४४ मते पडली. साधारणत: रात्री १२ वाजेपर्यंत सगळी प्रक्रिया पार पडली. शेख यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने लातुरचा वकील संघ खर्‍या अर्थाने सेक्युलर झाला आहे अशी प्रतिक्रिया अण्णाराव पाटील यांनी व्यक्त केली.


Comments

Top