औसा: श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, आलमला ता. औसा द्वारा आयोजित पानी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा २०१८ करीता महाश्रमदान या अभिनव उपक्रमाचे आयोजन आज सकाळी ०६ वाजता श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या परीसरात करण्यात आले. हे महाश्रमदान संस्थेचे सचिव बसवेश्वर धाराशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या महाश्रमदानास आलमला, शिऊर, तांदुळजा, ऊटी, बाभळगाव येथील समस्थ ग्रामस्थ, लातूर, औसा, परीसरातील व संस्थेअंतर्गत सुरु असलेल्या शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज, विश्वेश्वरय्या पॉलिटेक्नीक, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्म डी, ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुल आणि ज्युनीअर सायन्स कॉलेज मधील सर्व प्राध्यापक, आजी माजी विद्यार्थी व कर्मचारी, अखिल भारतीय विद्यार्थी परीषद, लातूर वृक्ष, व्हीएस पँथर संघटना, जय क्रांती महाविद्यालय, जि.प. प्रशाला आलमला येथील महिला, लहान मुले, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरीक यांनी सकाळी ०६ ते ०९ या वेळेत साधारणत: १५०० श्रमदात्यांनी हातभार लावला. या संस्थेच्या वतीने आपलं गाव पाणीदार व्हावं, आपल्या परीसरातील पाणी आपल्याच भागात मुरावं, वाहणार्या पाण्याचे नियोजन लागावे म्हणून आयोजित करण्यात आलेल्या महाश्रमदान या अभिनव उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हयाचे उपजिल्हाधिकारी गंगाधर विधाते, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, तलाठी विकाम बुबने, ग्रामसेवक रणजित शिंदे, पानी फाऊंडेशन तालुका समन्वयक संग्राम सुर्यवंशी, टेक्नीकल ट्रेनर विशाल चौधरी, कृषी सहाय्यक एसआर जाधव आदी उपस्थित होते. यावेळी आलमला ग्रामपंचायतचे सरपंच कैलास निलंगेकर, शिवरुद्रप्पा धाराशिवे, ग्रामपंचायत सदस्य विजय कदम, शिवराज लोणारे, श्याम पावले, केदार निलंगेकर, शिवाजी कुंभार, संस्थचे उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, प्राचार्य प्रशांत धाराशिवे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, प्राचार्या फिरदोस देशमुख, प्रा. गोपाळ दंडीमे, विभाग प्रमुख प्रा. दिनेश गुलराथी, समीर शफी, शिवकुमार लद्दे, नितीन लोणीकर, सुरज मालपाणी, वागदरे एस.एस., गणेश गोसावी, प्रकाश शिवणेचारी, युवराज काटू, कापसे विद्या, थावरे प्रतिभा, रेवणसिध्द बुक्का, प्रवीण साबदे, मंगेश बिडवे, संदेश माडे, सतीष आंबुलगे, अंकुश बिडवे, प्रकाश गिरी इत्यादी उपस्थित होते. या महाश्रमदानाचे सुत्रसंचालन प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांनी केले.
या उपक्रमाची सुरुवात आज झाली. पण पावसाळा येईपर्यंत हा उपक्रम सातत्याने राबवला जाईल अशी माहिती प्राचार्य प्रशांत धाराशिवे यांनी दिली.
Comments