लातूर: आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. मुलगी वाचवा, मुलगी वाढवा, मुलगी शिकवा हा नव्या जमान्याचा नवा मंत्र जपत लातुरच्या लोकनायक संघटनेनं आज अभिनव उपक्रम राबवला. आज सरकारी दवाखान्यात जन्मलेल्या मुलींना या संघटनेनं पैंजणांचा आहेर केला तर त्यांच्या मातांना साड्या देऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला. लातूर येथील सर्वोपचार रुग्णालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने लोकनायक संघटनेच्या वतीने १४ एप्रिल रोजी जन्मास येणार्या २७ मुलींना चांदीचे पैजण भेट करन्य़ाआट आले. मुलींच्या आईला खन नारळ आणि साडी भेट देण्यात आली. ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ या अभियाना अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील स्त्रीभृण हत्या थांबावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असे अजित घार म्हणाले. प्रत्येकास आई-बहिण-बायको पाहिजे तर मग मुलगी का नको? असा सवाल किसन कदमांनी उपस्थित केला. समाजामध्ये दिवसेंदिवस स्त्रीभृण हत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यावर कुठे तरी प्रतिबंध आला पाहिजे. समाजात स्त्रियांचा दर्जा वाढवला पाहिजे, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपणच सर्वांनी घ्यावी लागेल असे ते म्हणाले. यावेळी महादू रसाळ, शिवा चवरे, बंटी गायकवाड, रवी लहाने, किसन कदम, नेताजी जाधव, अनूप घोडके, प्रमोद जोगदंड, अमोल गायकवाड, लखन शिरसाट, श्रीराम माने उपस्थित होते.
Comments