HOME   टॉप स्टोरी

२१०० साली जगात राहतील केवळ १० टक्के माणसे!- अतुल देऊळगावकर

पर्यावरणाचा र्‍हास, पृथ्वीचा विनाश, निसर्गाचरणात हस्तक्षेप, जागतिक वसुंधरानिमित्त खास मुलाखत


लातूर: आजवर पृथ्वीवरील सृष्टीचा पाचवेळा विनाश झाला आहे. आणि आताही आपली वाटचाल त्याच दिशेने सुरु आहे. जागतिक स्तरावर सर्वांनीच सगळे भेद बाजुला ठेऊन वसुंधरा रक्षणाचे मनापासून प्रयत्न केल्यास हे टाळता येईल, जगाच्या तुलनेत भारतात असे प्रयत्न जवळपास होतच नाहीत अशी खंत पर्यावरणतज्ञ, लेखक, पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली आहे. आज ४८ व्या जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपल्यासाठी घेतलेल्या मुलाखतीचा हा काही अंश....
अलिकडच्या काळ पृथ्वीवरील जैव विविधतेची साठ टक्के हानी झाली आहे. १९७० पासून हानीचं हे प्रमाण वाढलं आहे. अशाच वेगाने कर्ब उत्सर्जनही सुरु आहे, २०५० साली उत्तर ध्रुवावर बर्फ दिसणार नाही असं शास्त्रज्ञ सांगतात. आजवर पृथ्वीवरील आवश्यक सृष्टीचा विनाशच होत आला आहे. प्रदूषण वाढतंय, नद्या आणि जंगलांचा विनाश होतो आहे. २१०० साली जगात केवळ १० टक्के मानवजात शिल्लक राहील असं तज्ञांचं मत आहे. जात, धर्म आणि भुगोलाच्या भेदापलिकडे जाउन काम केल्यास हा विनाश टाळता येईल. मातीची प्रकृती झपाट्याने बिघडत चालली आहे. हिमालयात जंगल विनाश होत चालल्यानं पुराच्या शक्यता वाढत आहेत. पर्यावरणाचं आव्हान जागतिक आहे. त्याला उत्तर मात्र स्थानिक पातळीवरच द्यावं लागेल. पर्यावरण वाचवणारे दोनच घटक आहेत शेतकरी आणि आदिवासी, त्यांचं ज्ञान अमलात आणलं पाहिजे. जगाच्या तुलनेत पर्यावरण वाचवण्याचे प्रयत्न भारतात होत नाहीत. भारतात समुद्राची पातळी वाढण्याचा आणि त्सुनामीचा धोका अधिक संभवतो. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जागतिक स्तरावर सर्व भेद बाजुला सारुन प्रयत्न व्हायला हवेत असेही देऊळगावकर सांगतात.


Comments

Top