लातूर: उन्हाची तीव्रता वाढली आहे. जंगली प्राणी, रानावनातून शहरांचा आसरा घेण्याचा प्रकार वाढला आहे. त्यातचमाकड वानर माणसांना, कुत्र्यांना बिलकुलच दाद देत नाहीत. शहरात येऊनही त्यांना हवे ते मिळेलच असे काही नाही. मोठा प्राण्यांचे हे हाल असतील तर छोट्या प्राण्यांचे? विचारु नका. पाण्यासाठी यशवंतराव चव्हाण संकुलातून एक उंदीर थेट रस्त्याव आला. उष्णतेमुळे खाली पायांची होणारी आग आणि वरुन ४१-४२ डिग्रीने फायरींग करणारा सूर्य. अशा युद्ध प्रसंगात त्याला सावली गाठणे आवष्यक होते. तो या सावलीसाठी भटकू लागला, सैरभैर झाला. त्याला सावली काही मिळेना. अखेर त्याने एका मोटारसायकलच्या सावलीचा आधार घेतला...विसावला. पहा या उंदराचा संघर्ष!
Comments